Tu Tu Ni Mi Mi

कॉलेजच्या रस्त्यावर तिरपा एक रस्ता जातो
त्या रस्त्यावर झाडाखाली वाट मी पाहतो
तू येण्याच्या वाटेवरती लक्ष रोज मी देतो
धकधक ह्रदयाच्या तालावर नाव तुझे मी घेतो
तू ये ना, आता ये ना
तू तू नि मी मी, मी मी नि तू तू
करू मजा

तुझ्याकडे येऊन दुपारी नोट्स तुझ्या मी नेईन
बदल्यामध्ये बाईकवरती राईड तुला मी देईन
घट्ट मला तू धरून बसायचं आपण वारा व्हायचं
रस्ता नेईल तिकडे दूर दूर दूर जायचं
ये जाऊ चल जाऊ

कॉलेजच्या त्या पिकनिकमध्ये दोघं मिळून जायचं
गप्पा गाणी धमाल सगळी पावसामध्ये भिजायचं
एकमेकांच्या डोळ्यामध्ये हरवून हरवून राह्यचं
सहवासाच्या क्षणाक्षणाला सोनेरी करायचं
ये जाऊ चल जाऊ



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link