Sanjchya Ra Yerala

सांजच्या रं येरला
रानामधी फिरताना
अवचित दिसली ती
पानामधी शिरताना

नजर एक दिसली ती
निसटली चटकनशी
पोर सावळी पाकळी
दिलचोरखेच कशी
कुठं गेली कुठं अशी
हुरहुर लावून
भेटायाची ओढ तिजला
क्षणक्षण झुरताना

तिच्यावाचुनी मनाला
घडीभर उमगं ना
चोरी माझ्या काळजाची
झाली कशी समजंना
कुणाच्या रं नजरमधी
कुणाच्या रं जादू अशी
सावळ्या तनूची तिच्या
काळी जादू फिरताना



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link